नमस्कार मित्रांनो, जय शिवराय

आज एका वादग्रस्त विषयाला हात घालतोय, हा विषय अनेकांनी ज्यांच्या त्यांच्या सोईनुसार मांडला.

तर सध्या एक नवीनच षड्यंत्र फोफावत असून चुकीचा इतिहास समाजात पसरवल्या जात आहे तो असा की,

गणोजी शिर्के यांनी फितुरी करून शंभुराजेंना पकडून दिले किंवा रंगनाथ स्वामी, आणि कवी कलश औरंगजेबाला गुप्तपणे सामील होते. वगैरे.
या सर्व प्रकरणाचा आपण आज ससंदर्भ आढावा घेणार आहोत आणि हे षडयंत्र हाणून पाडणार आहोत.

छत्रपती संभाजी महाराज

सिंहाचा छावा, युवराज, स्वराज्यरक्षक अशा अनेक पदव्यांनी ज्यांना संबोधल्या जातं असा शापित राजहंस. रुद्राचा दुसरा अवतारच जणू. 
शंभुराजांच्या आयुष्यात अनेक वादळं आली पण त्या प्रत्येक वादळांना ते धीरोदात्तपणे सामोरे गेले. त्यांना त्याही वेळी बदनाम केल्या गेलं आणि अजूनपर्यंतही बदनाम केल्या जात होतं. वा. सी. बेंद्रे सारख्या इतिहासकारांनी त्यांचे निष्कलंक चरित्र उजेडात आणले.
छत्रपती संभाजी महाराजांना मुकर्रबखानाने कपटाने पकडून नंतर औरंगजेबाने त्यांना हाल हाल करून मारले हा इतिहास सर्वश्रुतच आहे. 
रायगड- पन्हाळा-मलकापूर- संगमेश्वर या घटना मी येेेथे मांडणार नाही.

थेट येऊ मुख्य मुद्द्याकडे ते म्हणजे त्यांना कोणी पकडून दिलं ? कोण होता तो स्वराज्यद्रोही ?


अनेक जणांनी गणोजी शिर्के हे नाव फितुरीशी जोडून त्यांना गद्दार म्हणल्या गेलंच आहे. तर काही जण कवी कलश आणि रंगनाथ स्वामी ही नाव घेतात.
तर यातील नेमकं दोषी कोण ? प्रत्येक पात्र आपण विस्तृतपणे जाणून घेऊ,


१) कवी कलश

कवी कलश हे नेहमीच संशयास्पद राहिलेले व्यक्तिमत्त्व. शंभुराजांचे जवळचे मित्र म्हणून अनेक जणांना त्यांच्याविषयी असूया होती.
मोगली इतिहासकार निकोलाय मनुची, काफीखान, ईश्वरदास नागर ही मंडळी कवी कलशांचे नाव घेतात.
पण यातील सत्यता जर आपण बघितली तर असे लक्षात येईल की कलश जर फितूर असते तर त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या समवेत अखेरपर्यंत अनन्वित अत्याचारांना साथ दिलीच नसती.

◆ ते औरंगजेबाला गुप्तपणे सामील असते तर पकडल्या गेलेच नसते, आणि जरी पकडल्या गेले असते तर त्यांना हालहाल करून मारले नसते.
कारण मुळात मदत करणाऱ्याला बक्षीस, इनाम द्यायची रीत आहे तरीही,
( जसे काहीजण म्हणतात की औरंजेबाने सख्ख्या भावाला, बापाला सोडले नाही तर कलश किस झाड की पत्ती) 
पण इथे एक मेख आहे, की कलश फितूर असते तर त्यांचे शीर औरंग्याने एका झटक्यात धडावेगळे करून मारले असते हालहाल करून नाही.

◆ दुसरा एक पुरावा म्हणजे मुघली इतिहासकारांनी जरी कवी कलशना दोषी मानलेले असले तरी मराठी इतिहासकार या गोष्टीला दुजोरा देत नाहीत.

◆ येसूबाई राणीसाहेब ह्या कवी कलशांच्या समकालीनच होत्या. जेव्हा १७०७ मध्ये शाहू महाराज आणि १७१९ मध्ये येसूबाईसाहेब औरंग्याच्या कैदेतून सुटल्या, तेव्हा या दोन्ही मायलेकरांनी वढू बुद्रुक तुळापूर येथे जाऊन छत्रपती संभाजी महाराजांची समाधी बांधून घेतली.
त्याचबरोबर शंभूराजांच्या समाधीच्या ४ हात बाजूस कवी कलशांची समाधी बांधून घेतली.
जर कवी कलश फितुर असते तर शाहूराजे आणि येसूबाई यांनी त्यांची समाधी का बांधून घेतली असती?
इथेच हा प्रश्न मिटला.
              छत्रपती संभाजी महाराज समाधी

           छंदोगामात्य कवी कलश यांची समाधी.


२ ) गणोजी शिर्के

मराठी इतिहासात सर्वाधिक बदनामी कोणा सरदाराची झाली असेल तर ती गणोजी शिर्के यांची.
गणोजी शिर्के हे छत्रपती शिवरायांचे जावई आणि छत्रपती संभाजी राजांचे मेहुणे होते.
शिर्क्यांना वतन जरी प्रिय असले तरी ते वतनासाठी इतक्या खालच्या थराला जाईल असे वाटत नाही.

गणोजींना फितूर दाखवण्याचे काम केले असेल तर ते मल्हार रामराव चिटणीस बखरीने. आणि आपल्या सर्वांना या बखरीच्याबद्दल माहीत आहे की ही किती विश्वासार्ह आहे,
चिटणीस बखर ही अलीकडच्या काळातील असल्याने त्याचबरोबर आपल्या पूर्वजांना शंभूराजांनी मारले याचा राग मनात धरून पूर्वग्रहदूषित मनाने चिटणीसाने ही बखर लिहलेली आहे, त्यामुळे ही बखर नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिलेली आहे.

ह्या चिटणीस बखरीचाच आधार घेऊन पुढे अनेक नाट्य, चित्रपट आणि कादंबरीकारांनी हाच कित्ता गिरवत गणोजींना दोषी ठरवले.

एक गोष्ट इथे लक्षात घ्या की समकालीन आप्त आणि परकीय कागदपत्रांमध्येही गणोजींचा शंभुराजांना पकडून दिले म्हणून उल्लेख नाही. 

◆  गणोजींनी फितुरी केली असती तर मराठ्यांनी त्यांना जिवंत ठेवले असते का ?

◆ कुठल्या भावाला असं वाटेल की आपल्या बहिणीचं कुंकू पुसावं ?

◆  पुढे छत्रपती राजाराम महाराजांना जिंजीच्या वेढ्यातून सोडवण्यासाठी गणोजी आघाडीवर होते ( जरी त्यासाठी खंडो बल्लाळ यांना आपले वतन सोडावे लागले )

◆  नंतर छत्रपती शाहू महाराजांनी शिर्के कुटुंबातील सकवारबाई यांच्याशी का विवाह केला ?

◆  छत्रपती राजाराम महाराज यांचे पुत्र संभाजीराजे दुसरे यांनी नारायणराव शिर्के यांची मुलगी सईबाई यांच्याशी विवाह का केला ?

◆ छत्रपती शाहू महाराजांनी शिर्क्यांचे शृंगारपूरचे वतन का बरं कायम केले ? 

या साऱ्या प्रश्नांचे उत्तर म्हणजे संभाजीराजांना पकडून देण्यात गणोजींचा हात नव्हता.


सारांश उपरोक्त व्यक्तींपैकी संभाजीराजांना पकडून देण्यात हात नव्हता.

शंभुराजांना पकडून देण्यासाठी नक्कीच कोणीतरी फितुरी केली असणार पण दुर्दैवाने त्या स्वराज्यद्रोह्यांचं नाव संदर्भाअभावी कळू शकलं नाही. 

लेखन :  रोहित पेरे पाटील.


संदर्भ :

निकोलाय मनुची
काफिखान
ज्वलज्वलनतेजस संभाजीराजा : डॉ. सदाशिवराव शिवदे
ईश्वरदास नागर
जदुनाथ सरकार

19 टिप्पण्या

  1. मित्रा, रंगनाथ स्वामी बदल काही जास्त माहिती दिली नाही वरील लेखात, ती अजून थोडी उपलब्ध करावी ही विनंती

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. नक्कीच माहिती देण्याचा प्रयत्न करीन. रंगनाथ स्वामी हे व्यक्तिमत्त्व फक्त काही बखरींमधून मी अभ्यासलेलं होतं. त्यावर अजून प्रकाश टाकण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन,
      धन्यवाद !

      हटवा
  2. वाचकांनसाठी मह्त्वाचा लेख 👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  3. खूपच सुंदर लिखाण,,,आपन जे अभ्यासू वाचन केले, त्याची व त्या संदर्भात pdf file वाचता आली तर आपला खूप आभारी

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद सर, pdf तर नाहीये पण अशाच अज्ञात इतिहास वाचण्यासाठी आपल्या ब्लॉगला नक्की फॉलो करा

      हटवा
  4. खूपच सुंदर लिखाण,,,आपन जे अभ्यासू वाचन केले, त्याची व त्या संदर्भात pdf file वाचता आली तर आपला खूप आभारी

    उत्तर द्याहटवा
  5. खुप आभ्यास पुर्ण वाचन आहे व सोप्या भाषेत मांडणी त्या मुळे साध्या लोकांना समजते

    उत्तर द्याहटवा
  6. बरोबर आहे अप्रतिम लेख आहे
    जय शिवराय

    उत्तर द्याहटवा

  7. ....कवी कलश तसेच गणोजी शिर्के यांनी पकडून दिले नसेल तर कोणी पकडले हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो ..कथा रहित असेल तर एवढ्या प्रमाणात असेल अस वाटत नाही काहीतरी कुठतरी थोडंफार तथ्य असावं कदाचित...

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. बरोबर सर, योग्य पुराव्याअभावी आपण ठामपणे काहीच सांगू शकत नाही, धन्यवाद !

      हटवा
  8. जय भवानी!जय शिवराय..!जय रौद्र शंभूराजे...
    नमस्कार आपण खूप अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे.. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्याशिवाय अभ्यास होणे नाही.. असो.. बखरकारांनी सूड बुद्धीने इतिहास लिहून मराठे व छत्रपती संभाजीराजे महाराज यांना कुलुशीत केले आहे.. माझ्या दृष्टीने खरे फितूर कोण हे इतिहासाला अज्ञान आहे किंवा त्याची कुठेही उल्लेख नाही ह्याचा अर्थ असा होतो कि जसे आपले गुप्तहेर खाते मजबूत होते व गुप्तहेर खात्यातील एखाद्या अधिकाऱ्यानी चूक केली तर त्या चुकीला शिक्षा देखील कठोर होत्या. तसेच श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या निधनानंतर श्रीमंत छत्रपती महाराज ह्यांनी औरंगजेबला सळो कि पळो करून सोडले त्यानंतर औरंगजेब नी त्याची गुप्तहेर यंत्रणा देखील मजबूत केली असेल तो तर बोलून चालून कपटी त्याची शिक्षा देखील भयानक व विकृत असणारच असणार यात काही शंका नाही.. असा माझा तर्क आहे.. तुम्ही इतिहास संशोधक आहात माझ्या पेक्षा आपण इतिहास चांगला माहिती आहे.. काही तर्क चुकल्यास क्षमस्व... धन्यवाद.. जय भवानी जय शिवराय. जय रौद्र शंभूराजे..!🙏⚔️🚩🚩🚩🚩..

    उत्तर द्याहटवा
  9. य भवानी!जय शिवराय..!जय रौद्र शंभूराजे...
    नमस्कार, मी योगेश प्रकाशराव खोपडे पुणे जिल्हा उपाध्यक्ष, अखिल भारतीय क्षत्रिय महासभा, युवा.. आपण खूप अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे.. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्याशिवाय अभ्यास होणे नाही.. असो.. बखरकारांनी सूड बुद्धीने इतिहास लिहून मराठे व छत्रपती संभाजीराजे महाराज यांना कुलुशीत केले आहे.. माझ्या दृष्टीने खरे फितूर कोण हे इतिहासाला अज्ञान आहे किंवा त्याची कुठेही उल्लेख नाही ह्याचा अर्थ असा होतो कि जसे आपले गुप्तहेर खाते मजबूत होते व गुप्तहेर खात्यातील एखाद्या अधिकाऱ्यानी चूक केली तर त्या चुकीला शिक्षा देखील कठोर होत्या. तसेच श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या निधनानंतर श्रीमंत छत्रपती महाराज ह्यांनी औरंगजेबला सळो कि पळो करून सोडले त्यानंतर औरंगजेब नी त्याची गुप्तहेर यंत्रणा देखील मजबूत केली असेल तो तर बोलून चालून कपटी त्याची शिक्षा देखील भयानक व विकृत असणारच असणार यात काही शंका नाही.. असा माझा तर्क आहे.. तुम्ही इतिहास संशोधक आहात माझ्या पेक्षा आपण इतिहास चांगला माहिती आहे.. काही तर्क चुकल्यास क्षमस्व... धन्यवाद.. जय भवानी जय शिवराय. जय रौद्र शंभूराजे..!🙏

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. खूप खूप धन्यवाद सर आपल्या प्रतिक्रियेबद्दल! मी वयाने आणि अनुभवानेही या इतिहास पंढरीतला नवखा भक्त आहे, आपण ज्येष्ठ आणि अनुभवी आहात. आपले मार्गदर्शन आणि सहकार्य असू द्या !

      हटवा
  10. खूपच छान वाचून मन भरून आलं.🙏🏻🙇🏻‍♂️🚩😢

    उत्तर द्याहटवा